NHM Jalgaon Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथील भरती मधून एकूण 47 जागांकरिता सुवर्णसंधी उमेदवारांना मिळणार आहे. 22 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. “एमओ एमबीबीएस, ऑडीओलॉजिस्ट कम स्पीचथेरपिस्ट, फिजोओथेरपिस्ट, मानसोपचार नर्स” या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती मिळवण्याकरिता खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचावा.
- 47 रिक्त जागांकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- एमओ एमबीबीएस, ऑडीओलॉजिस्ट कम स्पीचथेरपिस्ट, फिजोओथेरपिस्ट, मानसोपचार नर्स या पदांकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती.
NHM Jalgaon Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे आहेत.
- MO MBBS या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी MMC रजिस्ट्रेशन केलेले पाहिजे.
- ऑडिओलॉजईस्ट कम स्पीच थेरपिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून ऑडिओलॉजी या शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- फिजिओथेरपिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून फिजिओथेरपी या शाखेमध्ये पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- सायकॅट्रिक नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी D.P.N / M.Sc ( मनोविकार शास्त्र ) किंवा B.Sc Nursing ही पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने MNC रजिस्ट्रेशन पूर्ण केले पाहिजे.
- MO MBBS या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवाराचे वय 43 वर्षापर्यंत असावे.
- ऑडिओलॉजईस्ट कम स्पीच थेरपिस्ट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खुल्या वर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्षापर्यंत आहे.
- फिजिओथेरपिस्ट या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 43 वर्षापर्यंत असावे.
- सायकॅट्रिक नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 65 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन मिळणार आहे. MO MBBS या पदासाठी एकूण वेतन 60,000 प्रतिमा असणार आहे. ऑडिओलॉजईस्ट कम स्पीच थेरपिस्ट या पदाकरिता वेतन 25000 रुपये दरमहा असणार आहे. फिजिओथेरपिस्ट या पदासाठी एकूण वेतन दरमहा 20,000 रुपये असणार आहे. सायकॅट्रिक नर्स या पदाकरिता एकूण वेतन 25000 रुपये दरमहा असणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथील भरती मधून आवश्यकतेनुसार रिक्त पदे भरली जाणार आहेत. विविध पदांसाठी रिक्त पदे पुढील प्रमाणे. MO MBBS या पदासाठी एकूण 42 जागा रिक्त आहेत. ऑडिओलॉजईस्ट कम स्पीच थेरपिस्ट या पदाकरिता एकूण 02 जागा रिक्त आहेत. फिजिओथेरपिस्ट या पदासाठी 02 जागा आहेत. सायकॅट्रिक नर्स या पदाकरिता 01 जागा रिक्त आहे.
- सदरील भरती मधील पदांसाठी जळगाव शहरातील नोकरीचे ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यामध्ये MO MBBS या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला जिल्हा उप रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव या ठिकाणी काम करावे लागणार आहे. ऑडिओलॉजईस्ट कम स्पीच थेरपिस्ट या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना डीइआयसी व एमपीपीसीडी जळगाव या ठिकाणी काम करावे लागणार आहे. फिजिओथेरपिस्ट या पदावर नियुक्त उमेदवारांना डीइआयसी व एनसीडी जळगाव या ठिकाणी काम करावे लागणार आहे. सायकॅट्रिक नर्स या पदावर नियुक्त उमेदवारांना डीएमएचपी जळगाव या ठिकाणी काम करावे लागणार आहे.
- वरील सर्व पदांकरिता सामाजिक आरक्षण लागू असणार आहे. सामाजिक आरक्षणानुसार किती जागा कोणत्या पदाधिकारी तारीख असणार आहेत याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सायकॅट्रिक नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मनोविकार शास्त्र या विभागात काम केलेल्या चा अनुभव असणे गरजेचे आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NHM Jalgaon Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथील भरतीसाठी नियम व अटी खालीलप्रमाणे.
- सदरील भरती मधील भरण्यात येणारी पदे ही पूर्णपणे कंत्राटी तत्वावर भरले जातील. दिनांक 29 जून 2025 पर्यंत सदरील भरती मधील पदांचा कार्यकाल असेल.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव यांच्याद्वारे दिलेल्या नमुन्यामध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. कोणत्याही उमेदवारांनी अर्ज अपूर्ण भरला असेल तर अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल. सदरील भरती बाबत उमेदवाराचा अर्ज जर रद्द करण्यात आला तर त्याला उमेदवार स्वतः आधार असेल. याबाबतची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
- सदरील पदे हे कायमस्वरूपी नसणार आहेत. शासनाकडून कोणत्याही वेळी सदरील पदांना ना मंजुरी मिळाल्यावर उमेदवारांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल. ही पदे कंत्राटी चोरणे भरलेली असल्यामुळे या जागांवर उमेदवारांना कायम स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही.
- ज्या उमेदवारांनी CGPA पद्धतीने पदवी उत्तीर्ण केलेली आहे आशा उमेदवारांनी त्यांच्या मार्कशीट ची दोन्ही बाजूची प्रिंट अर्जासोबत जोडायचे आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी टक्केवारी पद्धतीने पदवी उत्तीर्ण केलेली आहे अशा उमेदवारांनी ची फक्त पुढची बाजू जोडायची आहे. जे उमेदवार पहिला प्रयत्नात पास झालेले नसतील आशा उमेदवारांनी त्यांच्यात सगळ्या मार्केटची प्रत अर्जासोबत जोडायचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे पण तो अनुभव प्रशासकीय आणि शासकीय संस्थेमध्ये काम केलेला असावा. त्या अनुभवाबद्दल उमेदवाराकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. खाजगी संस्थेमध्ये केलेला उमेदवाराचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
- ज्या उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचा आहे. आशा उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी सेपरेट अर्ज करायचा आहे. प्रत्येक पदाकरिता उमेदवारांनी एकत्रित मिळून शुल्क जमा करायचे आहे.
- सामाजिक आरक्षणाचा फायदा घेण्याकरिता कोणत्याही उमेदवारांनी एकाच प्रवर्गातून अर्ज करायचा आहे. दोन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांचा एक अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवार ज्या प्रवर्गातील आहे त्या प्रवर्गातील अर्ज ग्राह्य धरला जाईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क ही डिमांड ड्राफ्ट च्या स्वरूपात भरणे गरजेचे आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता शुल्क ₹ 150 असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क ₹ 100 असणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. पदावर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवारांनी दबाव तंत्राचा उपयोग करू नये. असे आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारा वरती कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसला पाहिजे.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला ठरलेले मानधन दर महिन्याला देण्यात येईल. या व्यतिरिक्त उमेदवाराला कोणताही भत्ता देण्यात येणार नाही.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव यांच्याद्वारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केल्यानंतर ती गुणवत्ता यादी जिल्हा परिषद जळगाव यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन ती गुणवत्ता यादी काळजीपूर्वक पहावी.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.