AAI Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे 135 जागांकरिता निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरती मधून 135 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 31 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. सदरील होणाऱ्या भरती मधून ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस या पदांकरिता योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- 135 रिक्त जागांकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे होणारा भरती मधून ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस या पदांकरिता योग्य अप्रेंटिस निवडण्यात येणार आहेत.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- प्रशिक्षणार्थी पदवीधर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून संबंधित विषयातून अभियांत्रिकी पदवी चार वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रमातून मिळवलेली असणे गरजेचे आहे.
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदवीधर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्ष नियमित अभ्यासक्रमाने संबंधित विषयाचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असणे गरजेचे आहे.
- ITI प्रशिक्षणार्थी पदवीधर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक या विषयांमधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी या पदासाठी एकूण 45 जागा आहेत.
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदासाठी एकूण 50 जागा रिक्त आहे.
- आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदासाठी 40 जागा रिक्त आहेत.
- पदवीधर प्रशिक्षणार्थी या AAI Bharti 2024 पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 15000 रुपये वेतन मिळेल.
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 12000 रुपये वेतन मिळेल.
- आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 9000 रुपये वेतन मिळेल.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- आयटीआय अप्रेंटिस या AAI Bharti 2024 पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- सदरील भरती मधील अप्रेंटिस पदाकरिता अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या डिप्लोमा धारक आणि पदवीधर उमेदवारांनी पदवी किंवा डिप्लोमा 2022 रोजी किंवा त्यानंतर उत्तीर्ण केलेला असावा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी 26 वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये सूट देण्यात येईल.
- अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड गुणवत्ता यादीनुसार सुरुवातीला करण्यात येईल.
- ज्या उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे आशा उमेदवारांना मुलाखतीसाठी डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावण्यात येईल.
- उमेदवाराला मुलाखतीत मिळालेले गुण, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी प्रमाणपत्र यांच्या आधारावर उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येणार आहे.
- ज्या उमेदवारांना भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा आहे. आशा उमेदवारांनी NATS / NAPS / RDAT या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले असणे गरजेचे आहे.
- प्रशिक्षणार्थी कायदा 1961 या कायद्याच्या नियम व अटींचे पालन उमेदवाराला प्रशिक्षणा दरम्यान करावे लागणार आहे.
- SC / ST , OBC, PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना जागांमध्ये आरक्षण देण्यात आलेले आहे. जर या प्रवर्गातील उमेदवार भरतीसाठी उपलब्ध झाले नाहीत तर त्या ठिकाणी इतर प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेनुसार भरण्यात येतील.
- करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराची निवड सदरील भरती करिता झाली नसेल तर अशा उमेदवाराला कळवण्याची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरण घेत नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही एका पदाकरिता अर्ज करायचा आहे. एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येईल.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र उमेदवाराला गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर, गव्हर्मेंट संस्थेमधील ऑफिसर यांच्याद्वारे प्रदान केलेले असावे.
- निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पातळीवर जर उमेदवाराने चुकीची माहिती दिलेली आहे असे समजले तर त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीद्वारे भरायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे करण्यात आलेली नाही.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या द्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कोणत्याही उमेदवाराकडून महत्त्वाची माहिती भरताना चुकली तर आशा उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- 31 ऑक्टोबर 2024 ही भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून अर्ज करण्याकरिता देण्यात आलेली शेवटची तारीख आहे.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून जाहिरात पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी ती पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सदरील प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आशा उमेदवारांमधून योग्य प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल.
- सदरील प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाकरिता पदावर नियुक्त होण्यासाठी कोणत्याही उमेदवारांनी जर अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- 31 ऑक्टोबर 2024 ही भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याद्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.
- AAI Bharti 2024 31 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- RHQ ( ER ), बेहरमपूर, बगदोगरा, भुबनेश्वर, कूच बेहार, देवघर, गया, झारसुगुडा, पटना, पाक्योंग, पोर्ट ब्लेअर, रायपुर, रांची या ठिकाणी उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील कागदपत्रे तपासून घ्यावीत.
- युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन नंबर
- फायनल डिग्री / डिप्लोमा सर्टिफिकेट
- कॉलेजचे / विद्यापीठाचे नाव
- मिळालेले मार्क्स / CGPA
- उमेदवाराची शाखा.
- पदवी / डिप्लोमा पास झालेला महिना आणि वर्ष.
- आधार कार्ड नंबर
- बँक डिटेल.
- चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी.
- पासपोर्ट साईज फोटो.
- AAI Bharti 2024 उमेदवाराने स्वतःचा तपशील दिलेल्या वेबसाईटवर टाकून अर्ज करण्यासाठी आपण पात्र आहोत का नाही हे पाहू शकता.
- उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर सेव बटन वर क्लिक करून सर्वप्रथम अर्ज सेव्ह करायचा आहे.
- अर्ज जमा केल्यानंतर उमेदवारांनी त्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायचे आहे.
- नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम यांच्या वेबसाईटवर सुद्धा उमेदवारांनी स्वतःला रजिस्टर करायचे आहे.
- उमेदवारांनी रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा यासंदर्भातील संपूर्ण माहिती स्क्रीनशॉट सहित जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.
- रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर उमेदवारांनी मिळालेल्या युजरनेम आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करायचे आहे आणि अर्ज करायला सुरुवात करायची आहे.